ई . पी. एफ. निवृत्तीधारकांचे नाशिकमध्ये धरणे आंदोलन

0

नाशिक | नाशिक जिल्हा ई.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनतर्फे आज निवृत्तीधारकांनी गोल्फ क्लब मैदानावर धरणे आंदोलन केले. या वेळ शेकडो ई.पि. एफ. पेन्शन धारक उपस्थित होते. आपला हक्क मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

या पेन्शन धारकांना किमान 3000 रूपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता मिळावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. डॉ. कोशियारी समितीच्या अहवालानुसार सवलती मिळाव्यात, अशीही या कामगारांची मागणी आहे. नो कोशियारी नो वोट , आमच्या मागण्या मान्य करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात राजू देसले, सुधाकर गुजराथी, डी.बी. जोशी. चेतन पणेर, सुभाष काकड, शिवाजी शिंदे, बापू रांगणेकर, शिवाजी डोबळ, नामदेव बोराडे, नारायण आडने, नईम शेख, व्हीं.डी. धनवटे आदी सह शेकडो कामगार, कर्मचारी सहभागी होते.