#MeToo: अलोकनाथ यांना अटकपूर्व जामीन

20

संस्कारी बाबूजी आलोक नाथ यांना दिलासा मिळाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन मंजूर केलाय. 20 वर्षांपूर्वी लेखिका-निर्मात्या विंता नंदा यांच्यावर बलात्कार केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. “हॅशटॅग मीटू” या मोहिमेअंतर्गत हे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणात न्यायालयाने आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.