..जेव्हा कट्टर विरोधक मुंडे बंधु-भगिनी एकाच व्यासपीठावर येतात

204

बीड | परळीमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजकारणातील कट्टर विरोधक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यामुळे परळी आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडेंचीच चर्चा होत आहे.

परळी शहरातील साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांनी अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच महोत्सवाच्या एकाच व्यासपीठावर, राजकारणात विरोधक असणाऱ्या या बहिण-भावाला, सोबत पहाण्याचे औचित्य परळीकरांना मिळाले. या कार्यक्रमात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोघांनीही बाबासाहेब वाघमारे गुरुजी यांचा गौरव सत्कार केला.