दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले; रेल्वे, विमान सेवा ठप्प

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीला सोमवारी मुसळधार पावसानं झोडपलंय. दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने दिल्लीकरांची तारांबळ उडालीय. अवेळी पावसामुळे वाहतूक संथ झाली. तर, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली.

ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेय. तब्बल 15 रेल्वे उशिरा धावल्या. विमान सेवाही बाधित झाली. अनेक विमाने उशीराने उड्डाण घेतायेत. दरम्यान, आज दिवसभर दिल्लीतले वातावरण ढगाळ राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीचे तापमान 9 ते 21 अंश राह्ण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केलाय.