विंग कमांडर अभिनंदन यांची हवाई दलाकडून चौकशी पूर्ण, काही आठवड्यांसाठी जाणार रजेवर

0

एएम न्यूज नेटवर्क | विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानहून परतल्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता विंग कमांडर अभिनंदन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस रजेवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी मिग विमानाच्या मदतीने पाकच्या विमानांना पिटाळून लावले. पण या सर्व संघर्षात त्यांचे विमान पाकच्या हद्दीत कोसळले. विंग कमांडर अभिनंदनही पाकच्या तावडीत सापडले. पण भारताने पाकवर आणलेल्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकला त्यांची लगेचच सुटका करावी लागली. पाकमधून भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार झाले. त्यानंतर नियमाप्रमाणे लष्कराने पाकमधल्या एकूण अनुभवाबाबत जाणून घेण्यासाठी अभिनंदन यांची चौकशी केली.

रजेवर जाणार..

नियमानुसार चौकशी पूर्ण झाल्यानंतर अभिनंदन कामावर रुजू होणार असे सांगण्यात आले होते. पण डॉक्टरांनी अभिनंदन यांनी काही दिवस आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अभिनंदन काही दिवस वैद्यकीय रजेवर जाणार आहे. रजेहून परतल्यानंतर ते कामावर पुन्हा रुजू होतील अशी शक्यता आहे.