#CSMT : मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, चौकशीचे आदेश, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

4

मुंबई | येथील सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला तर 30 लोक जखमी झाले. आता या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तर या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहेत. तर जखमींनी 50 हजारांची मदत आणि उपचारांचा खर्च सरकारकडून केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यांकडून या दुर्घटनेची माहिती घेतली. साधारणपणे मागिल वर्षी या पुलाचे स्ट्रकचरल ऑडीट करण्यात आले होते. यामध्ये पूल सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते आणि काही मायनर दुरुस्ती सांगण्यात आल्या होत्या. ऑडीट होऊनही ही घटना घडली हे खूप चुकीच आहे. हे स्ट्रकचरल ऑडीट चुकीचे असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल. दुर्घटना कशी घडली याची सखोल चौकशी करण्यात येईल.