शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमामध्ये दाखल, सुरक्षा दलाकडून चोख बंदोबस्त

पुणे | कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी कोरेगाव भीमात दाखल झाले आहेत. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजय स्तंभाला मानवंदना दिली. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा कोरेगाव भीमात तैनात करण्यात आलाय. येथील इंटरनेट सेवाही तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.