क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर कालवश

मुंबई | क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर अनंतात विलिन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सचिन तेंडुलकर, राज ठाकरेसह अनेक दिग्गज सहभागी झाले होते. यावेळी सचिनने आपले गुरु आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी सर्वच भावूक झाले होते.  ‘वेल प्लेड सर…तुम्ही जिथे कुठे असाल तिथे लोकांना क्रिकेट शिकवाल’, अशा शब्दात सचिनने आपल्या गुरूंना श्रध्दांजली वाहिली.

सचिनसह विनोद कांबळी, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार या क्रिकेटपटूंना आचरेकर यांनी घडवले. 1990 मध्ये त्यांना ‘द्रोणाचार्य’, 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘श्री शिवछत्रपती जीवनगौरव’ तर 2010 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.