भीम आर्मीचे आझाद म्हणाले-संविधानाला धक्का लागेल, त्यादिवशी भीमा-कोरेगावची पुनरावृत्ती करू

2

एएम न्यूज नेटवर्क | प्रियंका गांधींनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतलेले भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे एका सभेत बोलताना त्यांनी देशाच्या संविधानाला धक्का लागला तर भीमा कोरेगावची पुनरावृत्ती करू असे म्हटले.

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना चंद्रशेखर आझाद म्हणाले की, तुम्ही मत देण्यापूर्वी एकदा रोहित वेमुलाच्या बलिदानाची आठवण नक्की ठेवा. हुकूमशाही किंवा अत्याचारी व्यक्ती हा कधीही कोणासाठी फायद्याचा ठरू शकत नाही. त्यामुळेच मी म्हटलो होतो की, भीमा कोरेगावची पुनरावृत्ती करू. पण अजून ती वेळ आलेली नाही. मात्र जर देशाच्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर भिमा कोरेगाची पुनरावृत्ती करू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.