“काँग्रेसमध्ये तिकिटासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात”, दिग्गज काँग्रेस नेत्याचा आरोप, पक्षालाही सोडचिठ्ठी

एएम न्यूज नेटवर्क । तेलंगानामध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का देत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे माजी सचिव तसेच ज्येष्ठ नेते पी. सुधाकर रेड्डी यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की, काँग्रेस पक्ष आपले तिकीट देण्यासाठी उमेदवारांकडे कथितरीत्या कोट्यवधी रुपयांची मागणी करतो.

त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पाठवला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लिहिले की, दुर्दैवाने काँग्रेसची परंपरा आणि पक्षाचे मूल्य – सिद्धांत आता बदलले आहेत. गतवर्षीची विधानसभा निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो वा सध्याची लोकसभा निवडणूक, तिकीट वाटपात रुपयाचा प्रभाव वाढला आहे. रेड्डींनी पुढे लिहिले की, पक्षाच्या तिकिटासाठी कोट्यवधी रुपयांची मागणी चकित करणारी आहे. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाच्या व्यावसायिकरणामुळेच मला पक्षाला सोडचिठ्ठी देण्यासाठी मजबूर केले आहे. त्यांनी असाही दावा केला की, भ्रष्ट आणि वाईट व्यवहारामुळेच राज्यात पक्षनेतृत्व अपयशी ठरले आहे.