काँग्रेसची मोठी खेळी, प्रियंका गांधींची सरचिटणीसपदी नियुक्ती

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रियंका गांधीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये ही नव्या पर्वाची सुरूवात असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच लोकसभेसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये याचा पक्षाला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.