युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार, फडणवीस-उद्धव यांची मातोश्रीवर चर्चा, सर्व 48 मतदारसंघाचा आढावा

3

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतेल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची एकूण रणनीती कशी असावी याबाबत या बैठकीत चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून

शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या राज्यातील प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार असल्याचेही या बैठकीत ठरले आहे. युती झाल्यानंतर शिवसेना 23 तर भाजप 25 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठे कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.