सविस्तर चौकशी होईलच, पण संध्याकाळपर्यंत प्राथमिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार-मुख्यमंत्री

0

मुंबई | सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक चौकशी पूर्ण केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. महापालिका आयुक्तांना ही चौकशी करण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

सविस्तर चौकशी होईलच, पण..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचबोरबर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली. यानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी तर होणारच आहे. पण त्याआधी आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

झालेले ऑडिट पुन्हा होणार

एलफिस्टन येथीव दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये जर या पुलाला फिट किंवा किरकोळ दुरुस्तीची गरज आहे, असे सुचवण्यात आले असेल तर ती गंभीर बाब आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.