फुगा फुगवणं जीवावर, सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर | शहरात अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलीय. सहा वर्षीय चिमुकल्याचा श्वसननलिकेत फुगा अडकल्याने मृत्यू झालाय. सानिध्य उरकुडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. घटनेच्यावेळी त्याने दोन फुगे आईला फुगवून मागितले आणि एक आपल्या खिशात ठेवला. बाहेर जाऊन तो फुगा त्याने फुगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्याच्या गळ्यात जाऊन अडकला. त्याने जाऊन आईला सांगितलं. आईने त्याला रुग्णालयात नेलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

सानिध्य वडिलांचा लाडका होता. तो रोज फुगे घ्यायचा एक आपल्या लहान भावाला द्यायचा आणि एक स्वतः ठेवायचा. वडिलांची परिस्थिती हलाखीची असतानाही आपल्या लाडक्या बाळाचे लाड पुरविण्यात ते कमी करत नव्हते. मात्र, त्याला जे फुगे आवडत होते. त्याच फुग्याने घात केल्याने त्याचे वडील दु:खी आहेत. मात्र इतरांसोबत अशी घटना घडू नये. यासाठी मुलांना एकांत सोडू नका असा सल्ला देत आहे.

लहानपणी सर्वांनीच असे प्रकार केले आहेत. पण ते किती जीवघेणे ठरु शकतात, हे या घटनेवरुन दिसते.