मोदी आणि योगीचा एकच नारा “ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा” : छगन भुजबळ

जळगाव | लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचारसभा सुरू आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. मोदी आणि योगीचा एकच नारा “ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा” असा यांचा नारा आहेत असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी जळगावातातील जामोद येथे ते बोलत होते.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात भाजपचा खरपूस समाचार घेतला. भाजपने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही असे ते म्हणाले. मोदींनी दरवर्षी दोन लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. याप्रमाणे आतापर्यंत दहा लाख नोकऱ्या द्यायला हव्या होत्या. मात्र या उलट ज्या होत्या त्या दोन लाख नोकऱ्या यांच्या काळात तरुणांच्या हातून गेल्या असा आरोप त्यांनी केला आहे तरुणांचा अपेक्षा भंग झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच मोदी आणि योगींचा, ‘ना घर बसे हमारा न बसणे देंगे तुम्हारा’ असा नारा आहे. अशी टीका त्यांनी केली आहे.