मोहम्मद शमीविरोधात कोलकात्यात आरोपपत्र दाखल, लैंगिक शोषणाचा आरोप

0
File Photo

एएम न्यूज नेटवर्क | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या विरोधात कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. शमीवर कोलकाता पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि लैंगिक छळाचे आरोप लावले आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले आहे. तिने शमीचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

मॅच फिक्सिंगचेही आरोप..

हसीन जहाँ हिने गेल्या वर्षी शमीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. शमीने मात्र हा सर्व प्रकार त्याचे करिअर संपवण्यासाठीचा कट असल्याचे म्हणत आरोप फेटाळले. पण हसीन जहाँने एवढ्यावरच न थांबता शमीवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोपही केला होता. त्या आरोपांनतर बीसीसीआयने शमीला वार्षिक करारापासून दूर ठेवले होते. बीसीसीआयने मॅच फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी केल्यानंतर शमीला या प्रकरणी क्लीन चीट मिळाली. त्यानंतर त्याचा समावेश वार्षिक करारात करण्यात आला. ए ग्रेडच्या क्रिकेकटपटुमध्ये शमीला स्थान मिळाले.

हसीन जहाँ हिने कोलकात्यातील लाल बाझार येथील पोलिस मुख्यालयात शमीच्या विरोधात कौटुंबीक हिंसाचार तसेच मानसिक आणि शारीरिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शमीच्या कामगिरीवरही परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांच्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेत शमीने चार सामन्यांत पाच विकेट मिळवल्या आहेत.