पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ब्लॅकमेलर’, चंद्राबाबू नायडूंची घणाघाती टीका

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर आहेत, अशी घणाघाती टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चद्रांबाबू नायडू यांनी केली आहे. नरेंद्र मोदी आपले मत थोपवण्यासाठी आधी समोरच्या व्यक्ती विरोधात प्रकरण निर्माण करतात, नंतर स्वत:च त्याला त्यातून सोडवतात. मग त्याला ब्लॅकमेल करतात. असा गंभीर आरोप नायडू यांनी केला आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात, मोदींनीच प्रकरण दाखल करायला लावले, असेही ते म्हणाले. तेलांगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव, यांच्यावरही नायडूंनी शाब्दीक हल्ला केला आहे. केसीआर आणि मोदींना वाटते आंध्र प्रदेशची प्रगती होऊ नये, त्यामुळेच ते मला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही नायडू म्हणाले.