बाललैंगिक अत्याचारासाठी मृत्युदंड, पॉक्सो कायद्यात मोठा बदल

नवी दिल्ली | बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी लागू करण्यात आलेला पॉक्सो कायदा आता आणखी कडक करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचार झाल्यास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून मृत्युदंडाच्या शिक्षेला परवानगी दिली आहे. पॉस्को कायद्यात सुधारणा करण्यात आली असून त्याअंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.