राहुल गांधींचा बजेटवरून मोदी सरकारवर निशाणा

17

निवडणुकीपुर्वीचा शेवटचा जुमला असल्याचं आरोप

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेटवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना 17 रुपये देणं हा त्यांचा अपमान आहे, अशा शब्दांत राहूल गांधींनी सरकारवर टीका केलीय. ‘हॅश टॅग आखरी जुमला बजेट’ असं ट्विट करून राहुल गांधींनी हा निवडणुकीपुर्वीचा शेवटचा जुमला असल्याचं म्हटलंय. ‘प्रिय नरेंद्र मोदीजी, तुमच्या पाच वर्षाच्या अकार्यक्षम आणि अहंकारी सरकारनं शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 17 रुपये रोज देऊन सरकारनं त्यांचा अपमान केलाय.’ असं राहूल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय.