5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, मोदी सरकारची मोठी घोषणा

8

निवडणुकांआधी मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट

नवी दिल्ली | अर्थसंकल्पामध्ये प्राप्तीकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आता 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. 3 कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मध्यमवर्गीयांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा आहे. सध्या अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त होतं. मात्र, आता पाच लाखांपर्यतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के, तर 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.