Budget 2019: निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांचा पाऊस

मध्यमवर्गीयासांठी मोठा दिलासा

नवी दिल्ली | मोदी सरकारकडून अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सरकारने लोकसभा निवडूक डोळ्यासमोर ठेवून, या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडलाय. प्राप्तीकराच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सहा हजार रुपयांची मदत, संघटीत-असंघटीत क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीवेतनाची हमी, श्रमिकांना दरमहा 3 हजार पेन्शन, अशा अनेक लोकप्रिय घोषणा पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात केल्या.

अर्थसंकल्पालील महत्त्वाचे मुद्दे…

> लोकसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर मोदी मोदींच्या घोषणा

> महिलांच्या बँक खात्यात 40 हजारांच्या व्याजावर कर नाही

> दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कोणताही कर नाही

> करमुक्त मर्यादेचा 3 कोटी लोकांना होणार फायदा

> 5 लाखांच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही

> आयकराची मर्यादा 5 लाखांवर

> मनरेगासाठी 60 हजार कोटींची तरतूद

> किसान सन्मान योजनेसाठी 75 हजार कोटी

> महागाई कमी केली, योजनांवर खर्च वाढवला

> आधुनिक शेतीवर भर देण्याचा प्रयत्न

> ग्रामीण उद्योगांना संरक्षण देण्याचा प्रयत्न

> भारत उपग्रह प्रक्षेपण करणारे सर्वात मोठे केंद्र

> 2022 पर्यंत भारत स्वदेशी उपग्रह अवकाशात सोडणार

> 10 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य

> नोटबंदीनंतर 1 कोटी लोकांनी आयटी रिटर्न भरला

> घरं खरेदीवेळीचा जीएसटी घटवण्याचा विचार

> राज्यांनाही दिली उत्पन्नाची हमी

> उद्योजकांना 6 टक्के जीएसटी द्यावा लागणार

> टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत 80 टक्के वाढ

> महामार्ग निर्मितीत भारत पहिल्या क्रमांकावर

> रेल्वेचा तोटा कमी करण्याचे प्रयत्न

> मोबाईल डेटाच्या वापरात 50 टक्के वाढ, देशात डिजीटल क्रांती सुरू

> मोबाईल कंपन्यांच्या संख्येतही वाढ

> गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांच्या पगारी रजेची तरतूद

> गेल्या 5 वर्षात देशाचा आत्मविश्वास वाढवला, वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था

> असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना, 60 वर्षे पार कामगारांना 3 हजार रुपये पेन्शन

> संघटीत क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळणार

> पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना

> पशूपालन करणा-या शेतक-यांना व्याजदरात 2 टक्के सूट

> गोमातेच्या संरक्षणासाठी सरकार सर्वकाही करणार

> 21 हजार कमावणा-या कामगारांना सात हजाराचा बोनस देणार

> निवडणूकीआधी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

> 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा

> 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार

> भारत प्रगतीपथावर, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार

> आमच्या सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं-गोयल

> भारत प्रगतीकडे वाटचाल करणारा देश ठरतो आहे-गोयल

> अर्थमंत्री पीयूष गोयल यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू

> संसदेच्या कामकाजाला सुरूवात

> अंतरिम अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेच्या आवारात आणण्यात आल्या.

> गोयल अर्थमंत्रालयात पोहोचले, थोड्यात वेळात संसदेत अर्थसंकल्प सादर करणार

> पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता

> लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाकडं संपूर्ण देशाचं लक्ष

> मोदी सरकार आज सादर करणार शेवटचा अर्थसंकल्प

> अपेक्षा पूर्ण होणार का ?

> बजेट पार्श्वभूमीवर सेनसेक्स मध्ये १२२ अंशांनी वाढ

> कृषी योजनांवर ७० हजार ते १ लाख कोटी रुपयांची तरतूदीची शक्यता

> सवलतींचा पाऊस पाडण्यासाठी सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार

> पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहचले

> पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक