भारत पाक सेमेवरील गावात मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने ‘बीएसएफ​मध्ये’ चिंता

नवी दिल्ली | भारत – पाक सीमेवर असणाऱ्या राजस्थानमधील जौसलमेर जिल्ह्यातील अनेक गावात मुस्लिम लोकसंख्या वाढल्यानेे, सीमा सुरक्षा दल(बीएसएफ)​ने​ चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या लोकसंख्येवरून याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. पाक सीमेवरील मुस्लिमांची वाढती लोकसंख्या चिंताजनक असल्याचं बीएसएफने म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणानुसार, सीमा परिसरात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत​ असून,​ मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरता​ देखील​ वाढत​ असल्यांचं समोर आलं आहे.​

सीमा सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वीच जैसलमेर भागात राहणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जैसलमेर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत अमुलाग्र बदल होऊन त्यातून राजस्थानची छबी नाहीशी होत चालली आहे, असं धक्कादायक निरीक्षण सीमा सुरक्षा दलानं नोंदवलं आहे. तसेच सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल 20 ते 22 टक्के वाढ झाली आहे. इतर धर्मियांची लोकसंख्या 8 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सर्वेक्षणा​तून समोर आलं आहे. ही परिस्थिती चींताजनक असल्याचं​​  बीएसएफ​ने म्हटलं आहे.