‘राज’निर्णय: मनसे लोकसभा लढवणार नाही, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता

1

एएम न्यूज नेटवर्क । स्थापनेनंतर राज्यात 13 आमदार निवडून आणणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धिपत्रकातून हा निर्णय कळवला.

9 मार्च रोजी झालेल्या 13व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच राज ठाकरे याबाबत घोषणा करणार असे सर्वांना वाटत होते. परंतु तेव्हा त्यांनी लोकसभेबाबत नंतर निर्णय कळेल, अशी भूमिका स्पष्ट केली. आता मनसे लोकसभेत राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठी मनसे राष्ट्रवादीला पाठिंबा देईल अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, 2019ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करून मनसेने चर्चांना विराम दिल्याचे स्पष्ट झाले आहे.


19 मार्च रोजी होणाऱ्या सभेत आता राज ठाकरे काय भूमिका घेतात, राष्ट्रवादीला पाठिंबा देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.