‘सुपरमॉम’ मेरीकोमने रचला इतिहास, सहाव्यांदा ठरली विश्वविजेती !

0
18

नवी दिल्ली | बॉक्सिंगपटू मेरीकोमने आज वुमन्स वर्ल्ड बाँक्सिंग चॅम्पियनमध्ये सुवर्ण जिंकले आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरित खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच. ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. अशी कामगिरी करणारी मेरीकॉम पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे.

यापुर्वी मेरीकॉम आणि आयर्लंडच्या केटी टेलर यांच्या नावावर प्रत्येकी पाच सुवर्ण होते. मेरीकोमने या विजयासह कॅटीला मागे टाकले आहे.

मेरी कोमने गोल्ड मेडलचा षटकार लगावला असून पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील दिग्गज खेळाडू फेलिक्स सेवॉनची बरोबरी साधली आहे. फेलिक्सच्या नावावर सहा गोल्ड मेडल आहेत. मेरी कोमने आज जिंकलेले गोल्ड मेडल हे खास आहे. 8 वर्षानंतर मेरीकोमने सुवर्ण पदक जिंकले आहे.

मेरीकॉमने जिंकलेले पदक

वर्ष जागा पदक
2001 पेंसिलव्हेनिया रौप्य
2002 तुर्की सुवर्ण
2005 रूस सुवर्ण
2006 नवी दिल्ली सुवर्ण
2008 चीन सुवर्ण
2010 बारबाडोस सुवर्ण
2018 नवी दिल्ली सुवर्ण