हिवाळ्यात हे पदार्थ ठरतील लाभदायक

0
11

प्रत्येक ऋतूमानाप्रमाणे आपण दैनदिंन जीवनात खाण्यांच्या पदार्थांचा वापर करत असतो. आरोग्यास पूरक तसेच लाभदायी ठरणाऱ्या पदार्थांकडे आपला अधिक कल असतो. त्याद्वारे आपण आपल्या दैनदिंन जीवनात खाण्यापिण्याचे नियम ठरवून घेतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? तर चला जाणून घेऊया… हिवाळ्यात कोणते पदार्थ लाभदायी ठरतील.

बोरे
बोरं ही हिवाळ्यात कमी प्रमाणात मिळतात. हिवाळ्यात अनेकांना आव पडण्याचा किंवा आमांशाचा त्रास असतो. त्यामुळे बोरे त्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच पित्त कफ कमी करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे पोट साफ होत नसेल तर बोरांचा वापर करावा.

जव \ बार्ली

उत्तर भारतामध्ये थंडी खूप असल्याने तेथे या धान्यांचा पुष्कळ प्रमाणात वापर केला जातो. थंडीमध्ये ज्या व्यक्तींना सर्दी-खोकला होत असेल तर आहारात जवाचा वापर करता येऊ शकतो. थंडीच बऱ्य़ाच वेळा अवयव अखडले जातात त्यावरही जव प्रतिबंधक म्हणून उपयोगी ठरू शकतो. बार्ली किंवा जवाला धान्यराज किंवा संस्कृतमध्ये यव असेही म्हटले जाते.

लसूण
लसूण हे थंडीमध्ये अतिशय गुणकारी असते. शरिरात उष्णता निर्माण करण्याचे काम हे लसूण करते. आपल्याकडे प्रत्येक ऋतूमध्ये खाण्या-पिण्याची एक वेगळी खासियत असते. थंडीमध्ये लसणांचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो. एक कर पाण्यात लसणाची एक पाकळी किंचिंत ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो.

गाजर
गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा हा तर अनेकांच्या आवडीचाच पदार्थ असतो. हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते. ज्या लहान मुलांचे वजन कमी आहे त्यांना गाजर दुधाबरोबर शिजवून केलेला हलवा जरूर द्यावा, त्याने वजन वाढायला मदत होते.

अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो.