मुंबईत चोरी झालेला नेकलेस सापडला पश्चिम बंगालमध्ये, व्हॉट्सअप डिपीची मदत

0
19

मुंबई – एखादे गुन्हेगारी प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांना अनेक निकशांचा विचार करावा लागतो. कधी कोणता पुरावा कामी येईल हे सांगता येत नाही. असेच एक चोरीचे प्रकरण सोडवण्यासाठी मुंबई पोलिसांना चक्क व्हॉट्सअपचा डिपी उपयोगात आला आहे.

सात रस्ता रोडवरील, कल्पतरू इमारतीत राहणाऱ्या रीटा गोराई (40), या एका कंपनीच्या संचालक पदावर काम करतात. रीटा यांचा सोन्याचा नोकलेस काही दिवसांपूरर्वी चोरीला गेला होता. त्यांच्या एका मित्राने त्यांना तो भेट म्हणून दिला होता. नेकलेस चोरी झाल्यानंतर काही दिवसांनी रीटायांना तो नेकलेस त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकांच्या व्हॉट्सअपचा डिपीवर दिसला. जो त्यांनी गळ्यात परिधाण केला होता. त्यानंतर राटी यांनी लगेचच आग्रीपाडा पोलिसस्टेशन गाठले. त्यांनी त्या नातेवाईका विरोधात तक्रार दाखल करत तो नेकलेस स्वत:चा असल्याबाबतचे सर्व पुरावे दिले. त्यावर चोरी गेलेला नेकलेस हा रीटा यांचा असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी तो नेकलेस ताब्यात घेतला आणि रीटा यांना सुफूर्द केला.