शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार; पहिली, दुसरीच्या मुलांची गृहपाठातून सुटका

0
11
(फाइल फोटो)

नवी दिल्ली | इयता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थांना लवकरच गृहपाठातून सुटका मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून त्याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. सोबतच विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे किती असावे याबाबतही नियमावली तयार करण्यात आली आहे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दप्तराचे कमाल वजनही ठरवून देण्यात आले आहे. ही नियमावली देशातील सर्व राज्यांना तसेच केंद्रसाशीत प्रदेशांना लागू असणार आहे.

इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एनसीईआरटीच्या शिफारशीनुसार गणित, भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याचेच निर्देश आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढू नये यासाठी त्यांना अतिरिक्त पुस्तके आणि शालेय साहित्य आणण्याचेही निर्देश आता देता येणार नाहीत. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना फक्त गणित व भाषा विषय शिकवण्याची परवानगी मंत्रालयाने दिली आहे.

एवढे असेल दप्तराचे ओझे
> पहिली आणि दुसरी – 1.5 किलो
> तिसरी ते पाचवी – 3 किलो
> सहावी आणि सातवी – 4 किलो
> आठवी आणि नववी – 4.5 किलो
> दहावी – 5 किलो