अयोध्या सोडा….जामा मस्जिद तोडा : साक्षी महाराज

0
15

देवांच्या मूर्ती आढळल्या नाही तर मला फासावर लटकवा

उन्नाव | भाजपचे साक्षी महाराज नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असताता. पाच राज्यात होउ घातलेल्या विधानसभा निवडणूकीवरून आता राजकारण तापत आहे. राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असतानांच, भाजपच्या साक्षी महाराजांनी दिल्लीतील जामा मस्जीदबद्दल वादग्रस्त विधान केलयं. त्यामुळे निवडणूकीच्या पारश्वभूमीवर नविन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी उन्नावमधील एका कार्यक्रमात साक्षी महाराज म्हाणाले ”मी जेव्हा राजकारणात प्रवेश केला होता, तेव्हा मी म्हणालो होतो की काशी, मथुरा, अयोध्या सोडा….जामा मस्जिद तोडा. मशिदीच्या पायऱ्यांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील. जर मूर्ती आढळल्या नाही तर मला फासावर लटकवा. मी आजही माझ्या विधानावर ठाम आहे”.

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून होत असलेल्या राजकारणात आता हा नविन मुद्दा जोडल्या जात असल्याचे बोलल्या जातयं. साक्षी महाराज नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. त्यांच्या या विधानाने ते परत एकदा चर्चेत आले आहेत.