भोवळ आल्‍याने नितीन गडकरी व्‍यासपीठावर कोसळले, उपचार सुरू

0
31

नगर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भोवळ येऊन व्‍यासपीठावर कोसळले. राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्‍यांना सावरल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. नगरमध्‍ये राहुरी कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभादरम्‍यान ही घटना घडली.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवी प्रदान समारंभाला नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होणार होती. राष्ट्रगीत सुरु असतानाच गडकरींना अचानक भोवळ आली. त्‍यांना राज्‍यपालांनी सावरल. त्‍यानंतर त्‍यांना तातडीने रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. त्‍यांच्‍यावर सध्‍या उपचार सुरू आहेत. त्‍यांची प्रकृती स्थिर असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

राहुरी येथील कार्यक्रम आटोपून गडकरी शिर्डी येथे जाणार होते. मात्र, त्यांना भोवळ आल्‍याने त्‍यांचा नियोजीत दौरा रद्द करण्‍यात आला आहे.