रेल्वेच्या धडकेने वाघाचे बछडे मृत्युमुखी

0
13

चंद्रपूर : रेल्वेने धडक दिल्याने वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाहोरा वनविभागात घडली आहे. राज्यात अवनी वाघिणीचे प्रकरण ताजे असतानाच या बछड्यांचा मृत्यूने वाघाच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेप व वन्यजीव-मानव संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वाघाच्या बछड्यांचे मृतदेह हे रेल्वे रुळाच्या मधोमध पडलेले होते. स्थानिक पोलिस, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. रेल्वे रुळ ओलांडत असताना या बछड्यांना रेल्वेने धडक दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.