तुम्हाला माहिती आहे का? भारताबाहेरही उत्साहात साजरी होते दिवाळी

0
9
demo pic

दिवाळी म्हटलं की मनात वेगवेगळ्या कल्पना तयार व्हायला लागतात. दिव्याची आरास, दारासमोरील रांगोळी, फटाके, आणि महत्त्वाचं म्हणजे फराळाची मेजवाणी. यामुळे दिवाळी सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. भारतामध्ये गरिबांपासून श्रीमंतापर्यत आपापल्या परीने दिवाळी साजरी केली जाते. तुम्हाला हे माहिती आहे का? दिवाळी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील अतिशय उत्साहात साजरी केली जाते. तर जाणून घेऊया, कशी साजरी केली जाते भारताबाहेरील दिवाळी.

सिंगापूर – भारताप्रमाणेच सिंगापूरच्या एका भागात दिवाळी हा सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. लिटील इंडिया असे या भागाचे नाव असून तिथे रांगोळी तसेच दिव्यांची आरास, सजावट करून दिवाळी साजरी केली जाते.

इंग्लंड – भारताप्रमाणेच इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम आणि लेयस्टर इथे दिवाळी साजरी केली जाते. भारतातील लोकांची या ठिकाणी जास्त संख्या असल्यामुळे येते दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जातो.

नेपाळ – नेपाळमध्ये दिवाळीत होणाऱ्या लक्ष्मी पुजेला अधिक महत्त्व आहे. नेपाळमधील हा दुसरा मोठा सण आहे. दिवाळीला येथे तिहारी या नावाने ओळखले जाते.

मलेशिया – मलेशियात दिवाळीला हरी दिवाळी असे म्हटले जाते. इथल्या परंपरा या हिंदूस्थानापेक्षा वेगळ्या आहेत. इथे दिवाळी दिवशी संपूर्ण शरीराला तेल लावून आंघोळ केली जाते. मलेशियात फटाक्यांना बंदी असल्याने तिथे फटाके फोडले जात नाही.

कॅनडा – कॅनडाला मिनी पंजाबच म्हटलं जातं कारण इथे पंजाबी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथे दिवाळी अगदी पंजाबी स्टाईलने धूमधडाक्यात साजरी होते.

इंडोनेशिया – इंडोनेशियामध्ये भारताप्रमाणेच पारंपारीक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते.

फिजी – फिजी या देशळात हिंदुस्थानी नागरिकांची संख्या जास्त असल्याने या देशातही दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. फिजीमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देखील असल्याने शाळा, कॉलेज, कार्यालये बंद असत

मॉरिशिअस – मॉरिशिअसची 50 टक्के लोकसंख्या ही हिंदू असल्याने या देशातही दिवाळी दणक्यात साजरी होते.