मुंब्रा येथे रिक्षातून जिलेटिनच्या 250 कांडया जप्त; एकास अटक

0
7

ठाणे l मुंब्रा येथे वाहनाची तपासणी करताना एका रिक्षात जिलेटिनच्या 250 कांडया सापडल्या आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची रिक्षा थांबवली. तपासणी केल्यावर पोलिसांना या रिक्षात जिलेटिनच्या 250 कांडया सापडल्या. या कांड्या नेमक्या कशासाठी वापरण्यात येणार होत्या. त्या कुठून आणण्यात आल्या होत्या याबाबतचा तपास करण्यात येत आहे. श्वानाद्वारेही या परिसरात तपासणी करण्यात येत आहे.