SBI कडून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, या सुविधा मिळणार मोफत

0
10

SBIने धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे.

नवी दिल्ली- दिवाळीमध्ये सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्ताने ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. ग्राहकांना आता कर्ज घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. बँकेने पर्सनल लोनवरची प्रोसेसिंग फी शून्य केली आहे. ग्राहकांना या ऑफरचा फायदा 30 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे.

जेव्हा तुम्ही कर्ज घेता, त्यावेळी त्यासंबंधी इतरही शुल्क द्यावे लागते. त्यात व्याजाचे पैसे, प्रोसेसिंग फी, एडमिनिस्ट्रेटिव्ह, प्री-पेमेंटसह अन्य गोष्टींचा समावेश असतो. एसबीआयने कर्ज घेण्यातल्या प्रक्रियेतील शुल्क संपवले आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत पर्सनल लोन घेणा-यांना यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार नाही.

एसबीआयच्या माहितीनुसार, पर्सनल लोनवरचा इंटरेस्ट रेड दर दिवशी अन् महिन्याला बदलत असतो. पर्सनल लोनवरचा इंटरेस्ट रेट उर्वरित कर्जाच्या रकमेवर निर्भर असतो. त्यामुळे तुमच्या कर्जावरचे व्याजही कमी होते. पर्सनल लोनमध्ये सुरुवातीला तुमच्या कर्जाच्या रकमेवर महिन्याचा इंटरेस्ट रेट कॅलक्युलेट केला जातो. तसेच या इंटरेस्ट रेटचा तुमच्या ईएमआयवरही फरक पडत असून, ग्राहकांना याचा फायदा पोहोचणार आहे. पर्सनल लोनवरही व्याजाचे दर तुमच्या उत्पन्नानुसार ठरतात.