मोहन भागवतांना न्यायालयाची नोटीस

0
14

    पथसंचलनात काठ्या वापरल्याचे प्रकरण  

नागपूर | २८ मे रोजी राष्ट्रिय स्वंयसेवक संघाकडून करण्यात आलेल्या  पथसंचलनामध्ये काठ्या  (दंड) सोबत बाळगल्याप्रकरणी,न्यायालयाने सरसंघचालक मोहन भागवत आणि पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे यांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी संघाने 11डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करावे असे आदेश न्यायलयाने या नोटीसमधून दिले आहेत.

२८ मे रोजी पथसंचलन करण्यासाठी संघाला पोलीस उपायुक्तांनी काही अटींसह परवानगी दिली होती. कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही, अशा अटी घातल्या होत्या. त्यांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र संघाने तरी देखील पथसंचलनाच्या वेळेस जवळ  काठ्या बाळगल्याने अटींचे उल्लंघन झाले होते.

या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात  अर्ज दाखल केला होता. या अर्जाचा संदर्भ घेऊन संघाला सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे.