गौतम सिंघानिया यांचा रेमंड चेअरमन पदाचा राजीनामा, निर्विक सिंग नवे अध्यक्ष

0
18

मुंबई | रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया (53) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण ते कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहणार आहेत. रेमंड अॅपेरलने बुधवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली. तसेच, निर्विक सिंग (55) यांना रेमंड अॅपेरलच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदाची जबाबदारी मिळाली आहे. अंशु सरीन हे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि गौतम त्रिवेदी इंडिपेंडेंट डायरेक्टर बोर्डामध्ये सामील झाले आहे.

निर्विक हे मागील 7 वर्षांपासून रेमंड अॅपरल बोर्डामध्ये ..
निर्विक सिंग हे सध्या ग्लोबल जाहिरात एजन्सी ग्रे ग्रुपचे चेयरमन आणि सीईओ आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात लिप्टन इंडिया कंपनीपासून केली होती. ते 33 वर्षांचे असतानाच ग्रे ग्रुप इंडियाचे मुख्य बनले. निर्विक 27 वर्षांपासून मार्केटिंग आणि कम्युनिकेशन इंडस्ट्रीत जोडलेले आहे.

निर्विक यांच्या नियुक्तीवर गौतम सिंघानिया म्हणाले, मी नेहमी प्रोफेशनल पद्धतीने व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात राहिलो आहे. निर्विक सिंग यांना नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन नियुक्त करण्यावर मी खुश आहे.