भाजपसाठी राम मंदिर हा जुमला होता का? उध्दव ठाकरेंचा सवाल

0
13

मुंबई : प्रत्येकाच्या बॅंक खात्यात 15 लाख रुपये जमा करू हा जुमला होता. भाजपसाठी तसेच राम मंदिर हा देखील जुमला आहे का? असा प्रश्न शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

राम मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीच्या काळात चर्चेत येतो. एकदा निवडणूक झाली की हा मुद्दा पुन्हा विस्मृतीत जातो, याकडेही उध्दव ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुदद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली.