राखी सावंत लग्न करतेय, शेअर केली लग्नपत्रिका

0
14

मुंबई | बॉलिवूडमध्ये कोणताही वाद असो त्यामध्ये राखी सावंत उडी घेत नाही असे क्वचितच होते. नेहमीत चर्चेत असणाऱ्या राखीने आता आपल्या लग्नाची पत्रिका शेअर करुन फॅन्सना अश्चर्याचा धक्का दिला आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. याच वर्षी अभिनेत्री सोनम कपूर-आनंद अहुजा, नेहा धुपिया-अंगद बेदी ही जोडपी विवाहबंधनात अडकली. त्यापाठोपाठ अभिनेत्री अनुष्का आणि कर्णधार विराट कोहली यांचेही लग्न झाले. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या दोघांचे लग्न झाले. अभिनेत्री प्रियांका चोप्रा या आठवड्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या सर्वांमध्ये आता अभिनेत्री राखी सावंतची भर पडणार आहे.

राखी सावंतने दीपक कलाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. लग्नाच्या पत्रिकेसह तिने दोघांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. राखीने शेअर केलेली लग्नपत्रिका दीपक कलालनेही त्याच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे. पत्रिकेत लग्नाची तारीख 31 डिसेंबर आहे. लॉस एंजेलिसमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे राखीने म्हटले आहे.