‘2.O’ बॉक्स ऑफिसवर हिट, पहिल्याच दिवशी 100 कोटींच्या कमाईची शक्यता

0
10

बॉलिवूड डेस्क | सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांचा ‘2.O’ चित्रपट गुरूवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी बुक माय शो वर चित्रपटाचे दहा लाखांहून अधिक तिकीट बुक झाल्याची माहिती समोर येत आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भुमिकेत असलेला हा चित्रपट नविन विक्रम तयार करण्यासाठी सज्ज आहे. तिकिटाच्या आकड्यावरून ‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ आणि ‘बाहुबली’ या चित्रपटापेक्षा जास्त गल्ला करेल, अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी दिली आहे.

‘2.O’ हा चित्रपट पहिल्या दिवशीच 100 कोटीचा गल्ला करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या चित्रपटासाठी सध्या तरी बुक माय शो वर दहा लाखांहून अधिक तिकीट बुक झाल्याची माहिती समोर येत आहे.