राजस्थान विधानसभा निवडणूक : भाजपने शेवटची यादी केली जाहीर

0
25

राजस्थानात सर्व 200 जागेवर 7 डिसेंबरला मतदार होणार आहे.

जयपुर | राजस्थान विधानसभेच्या निवडनुकीसाठी भाजपने आज पाचवी आणि शेवटची यादी जारी केली आहे. यामध्ये आठ नावे आहे. सहा नावे नवीन आहेत. दोन जागेवर उमेदवार बदलले आहे. टोंकहून आमदार अजीत सिंह यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम मंत्री युनूस खान यांना उमेदवर बनवले आहेत. या जागेवर त्यांची टक्कर थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्याविरुद्ध होणार आहे. तसेच, खेरवडा क्षेत्रात शंकरलाल खिराडी यांच्या जागेवर नानलाल आहरी यांना तिकीट दिले गेले आहे.

राजस्थानात सर्व 200 जागेंवर 7 डिसेंबरला मतदार होणार आहे. तर निकाल 11 डिसेंबरला हाती येईल.

हे आहेत नावे

जागा          उमेदवार

कोटपुतली-   मुकेश गोयल
बहरोड-       मोहित यादव
करौली-       ओपी सैनी
टोंक-         यूनुस खान
केकडी-       राजेंद्र विनायका
डीडवाना-     जितेंद्र सिंह जोधा
खीवसर –    रामचंद्र उत्ता
खेरवडा-      नानालाल आहरी