राहूल महाजनचं तिसरं लग्न, 25 वर्षीय प्रेयसीसोबत विवाहबंधनात

0
16

मुंबई | लग्नासाठी नेहमीचं चर्चेत असलेला राहुल महाजन पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. त्य़ानं 25 वर्षीय कझाकिस्तानी प्रेयसी नात्याला लिनासोबत लग्न केले आहे. काही दिसांपूर्वीच मलबार हिल परिसरात या दोघांच्या लग्नाचा विवाहसोहळा पार पडला. हे दोघं गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे.

याआधी राहुल महाजननं पहिलं लग्न वैमानिक श्वेता सिंगसोबत केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्याने दुसरं लग्न ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून राहुलनं डिंपी गांगुलीशी केलं. लग्नानंतर चार महिन्यांतच राहुलकडून होणाऱ्या मारहाणीची तक्रार डिंपीने केली होती. त्यानंतर पाच वर्षांत दोघांचा घटस्फोटही झाला. राहुलपासून वेगळ झाल्यावर डिंपीनं दुबईतील उद्योजक रोहित रॉय याच्याशी विवाह केलं.त्यानंतर राहुलचं नाव मॉडेल अमृता मानेसोबत जोडलं गेलं. दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र त्या दोघांच लग्न झालं नाही.

राहुलनं कझाकिस्तानी मॉडेलशी लग्न केलं आहे. दोन लग्न अपयशी झाल्यानंतर तिसऱ्या लग्नाबाबत कोणालाही सांगायचं नव्हतं, म्हणूनच गाजावाजा न करता छोटासा विवाहसोहळा आटोपला अशी माहिती राहुलनं दिली.