‘..आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ला प्राईम टाईम द्या अन्यथा तोडफोड, मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा

0
9

कल्याण | ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्राईम टाईम शो न मिळाल्यास मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. सिनेमाला प्राईट टाईम शो द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.

अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाचे प्रेक्षकांकडून चांगलेच कौतुक होत आहे. मात्र सिनेमॅक्स थिएटरमध्ये या सिनेमाचा केवळ दुपरी तीन वाजताच शो आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 8 नोव्हेंबरला रिलीज झाला.

तसेच दुसरीकडे, मोठी स्टारकास्ट असलेला मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याने सध्या ठग्ज ऑफ हिंदोस्तानकडे पाठ फिरुन डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलेच उचलून घेतले आहे. पण थिएटरमध्ये सिनेमाला प्राईम टाईमच देण्यात आलेला नाही. यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. या चित्रपटाला प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे.