अॅमेझॉनवर सुरू झाला OnePlus 6T चा पहिला सेल, जाणून घ्या ऑफर्स

0
9

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘वन प्लस सिक्स टी’ या स्मार्टफोनच्या विक्रीला आजपासून सुरूवात झाली आहे. या नवीन फोनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फोनच्या 6.4 इंच स्क्रीनवर असलेला वॉटरड्रॉप स्टाइलचा नॉच असणार आहे. वन प्लसच्या युझर्सने दिलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासोबतच अनेक आकर्षक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर मध्यरात्री 12 वाजेपासून हा सेल सुरू झाला आहे. याशिवाय वन प्लसचे अधिकृत संकेतस्थळ, क्रोमा स्टोअर्स किंवा रिलायंस डिजीटल स्टोअर्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

हे आहे फोनचे फिचर्स
हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे.
बेसिक व्हेरिअंटची म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 37 हजार 999 रुपये आहे.
टॉप व्हेरिअंटची म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 45 हजार 999 रुपये असणार आहे.
मध्यम व्हेरिअंट म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 41 हजार 999 रुपये आहे.

अशा असेल ऑफर्स
सीटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 2 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
रिलायंस जिओकडून 5 हजार 400 रुपये कॅशबॅक आणि 3 टीबी 4जी डेटा
अॅमेझॉन-पेवर 1 हजार रुपयांचा कॅशबॅक
नो-कॉस्ट इएमआयची सुविधाही उपलब्ध असणार आहे.