खबरदार!! फेसबुकच्या 81 हजार युजर्सचे खाते हॅक, हॅकर्सकडून पर्सनल डेटाची विक्री

0
20

सोशल मीडियात आघाडीवर असलेल्या फेसबुकचा डेटा लीक झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या. त्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हॅकर्सने फेसबुकच्या 81 हजार युजर्सचे फेसबुक खाते हॅक करून डेटा चोरी केला असून एका युजरची माहिती 6.50 रुपयांमध्ये विक्री करण्यात येत आहे. डेटा विक्रीसाठी ज्या वेबसाइटवर पब्लिश करण्यात आला, त्याचे डोमेन रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये सांगण्यात येत आहे.

हॅकर्सकडे 12 कोटी युजर्सची माहिती
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ‘एफबीसेलर’ नावाच्या एका युजरने 12 कोटी अकाऊंट्सची विक्री केल्याची माहिती दिली की, त्यांच्याकडे 12 कोटी युजर्सची माहिती आहे. ही माहिती ते विकणार आहेत. याविषयी बीबीसीकडून सायबर सेक्युरिटी फर्म डिजिटल शॅडोजने प्रकरणाचा सखोल तपास केला, तेव्हा तब्बल 81 हजार युजर्सची खासगी माहिती त्यांच्या व्यक्तीगत मेसेजसह विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले. यासोबतच 1 लाख 76 हजार युजरचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर देखील हॅकर्सकडे आहेत. हा डेटा हॅकर्सना सहज मिळाला कारण, अनेक युजर्स आपला ई-मेल आणि फोन नंबर स्वत:च पोस्ट करतात.

रशियन वेबसाइटने हॅक केला डेटा…
बीबीसीने आपल्या रिपोर्टमध्ये डेटा कोणी चोरला याची माहिती दिलेली नाही. परंतु, ज्या वेबसाइटवर युजर्सचा डेटा विक्री असल्याची जाहिरात देण्यात आली, त्या वेबसाइटचे डोमेन रशियाच्या सेंन्ट पीटर्सबर्गमध्ये आहे.