पाकिस्तान vs न्यूझीलंड, कसोटी मालिकेत न्यूझीलंडची 1-0 अशी आघाडी

0
10

अबुधाबी – पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा पहिला सामना सोमवारी अबुधाबी येथे पार पडला. अवघ्या चार धावांच्या फरकाने न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली.

न्यूझीलंड संघाचे 176 धावांचे लक्ष पाकिस्तानला पार करता आले नाही. तर, गोलंदाजीमध्ये अजाझ पटेल चांगलाच चमकला त्याने पाकिस्तानचा निम्मा संघ पवेलियनमध्ये पाठला. अजाजने 59 धावेमध्ये 5 बळी घेतले तर नेईल वाग्नर आणि ईश सोदी प्रत्येकी 2 गडी बाद करत पाकिस्तानचा 171 धावांत घाशा गुंडाळला. तर कर्णधार केन विल्यमसनने संघात सर्वाधिक 77 धावा केल्या.

पाकिस्तानच्या अझर अलीने संघाच्या विजयाची जबाबदारी अंगावर घेत पाच चौकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. परंतू अजाझच्या फिरकी गोलंदाजी समोर त्याचा टिकाव लागाला नाही. तर, पाकिस्तानच्या शेवटच्या चार खेळाडूंना खाते न खोलता माघारी परतावे लागले.