महिला आयोगासमोर नानाने फेटाळले तनुश्रीचे आरोप

0
14

 

मुंबई | गेल्या काही दिवसापूर्वी #MeeToo मोहिमे अतंर्गत तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर विनयभंगाचे आरोप केले होते. त्याबद्दल तिने महिला आयोगतही नाना विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला नाना पाटेकरांनी उत्तर दिले आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी काल प्रथमच महिला आयोगा समोर उपस्थीत राहुन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून नाना पोटेकर बद्दल प्रतिक्रीया येत होत्या. सोबतच नाना समोर येऊन आपली बाजू का स्पष्ट करत नाहीत ? असे अनेक प्रश्न उपस्थीत केल्या जात होते. मात्र आता राज्य महिला आयोगासमोर झालेल्या चौकशी दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. 2008 साली हॉर्न ओके प्लिज या सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान नाना पाटेकरांनी आपल्याशी गैरवर्तण केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. नाना पाटेकरांनी डान्स करतांना चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्याचा दावाही तनुश्री दत्ताने केला होता.

तनुश्रीच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारावर आशा प्रकारचे आरोप झाले. त्यानंतर ह्या प्रकरणाचे ##MeeToo मोहीमेत रूपांतर झाले. या मोहीमेअंतर्गत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तीवर असे आरोप झाले आहेत. यामध्ये आलोक नाथ, अनू मलीक, विकास बहेल ते दिग्दर्शक साजीद खान अश्या अनेक व्यक्तीचें नावे या प्रकरणाशी जोडले गेले आहेत.