कोल्हापूरमध्ये 5 किलो वजनाच्या नवजात बालकाचा जन्म

0
10

कोल्हापूर – कोल्हापूरमध्ये एका 34 वर्षीय महिलेने 5 किलो वजनाच्या नवजात बाळाला जन्म दिला आहे. कोल्हापूरमधील पत्की हॉस्पीटलमध्ये या बाळाचा जन्म झाला. प्रसूती दरम्यान बाळाचे वजन हे जास्त असल्याने बाळाच्या आणि आईच्या जिवाला धोका होता. परंतू डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नानी महिलेची योग्यरित्या प्रसूती करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती महिलेचे नऊ महिने हे पूर्ण झाले होते. परंतू प्रसूतीला धोका निर्माण होईल अशी अनेक कारणे होती. प्रथम म्हणजे गर्भवती अवस्थेत महिलेच वजन हे 94 किलो झालं होत. त्यातच बाळाचा आकारही मोठा होता. महिलेला रक्तातील साखरेचा आजार होता प्रसूती दरम्यान तिची रक्तातील साखर आणखी वाढली होती. त्यामुळे डॉक्टरांपुढे महिलच्या प्रसुतीचा मोठा पेच निर्माण झाला होता. त्य़ामुळे गर्भवती महिलेच्या नातेवाईकांच्या सहमतीने सिजरींगचा पर्याय निवडूला आणि डॉक्टरांनी तिचे सिजरींग केले. शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वी रित्य़ा महिलेची प्रसूती करण्यात आली.