भरपुर पैसा कमवायचा आहे, तर रोज सकाळी ‘दिवसाची’ सुरवात करा अशा प्रकारे

0
18

प्रत्येकाची ईच्छा असते की आपल्याकडे भरपुर प्रमाणात पैसा असावा. पैसा कमवण्यासाठी प्रतेकजण आपल्या परिने कामं करत असतो. अनेकजण आधुनिक पद्धतींवर विश्वास ठेवत असले तरीही काही ठिकाणी अजून जुन्या परंपरा पाळल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरांमुळे आज देखील सकारात्मक फळ मिळू शकतं. चला तर मग जाणून घेऊयात रोज सकाळी तुम्ही कुठल्या गोष्टी केल्याने घरात सुख- सुमृध्दी येईल.

सकाळी उठल्या उठल्या आपले तळहात पाहावेत. असं केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे महालक्ष्मी, सरस्वतीसोबत विष्णू देवाची कृपा तुमच्यावर राहते.

रोज साकाळी आपल्या भूमीला प्रणाम करायला विसरु नका. जेव्हा तुम्ही पलंगावरून ऊठता तेव्हा पाय जमीनीवर ठेवण्याआधी भूमीला प्रणाम करुन क्षमा मागा. कारण धरती ही आपली माता आहे. त्यामुळे खाली पाय ठेवण्याआधी क्षमा मागीतल्याने तुमच्यातील दोष कमी होतो.

रोज सकाळी सुर्याला जल अर्पण करा. हा उपाय केल्याने घर, कुटुंब आणि समाजात मान-सन्मान मिळेल

प्रत्य़ेकजण रोज सकाळी नाष्टा करतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, सकाळी पहिली चपाती भाजल्यावर ती बाजूला काढून ठेवावी. नंतर वेळ मिळाल्यावर ती चपाती गायीला चारावी.