तेलंगणा काँग्रेसच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरउद्दीन

0
10

हैदराबाद | तेलंगणा काँग्रेसच्या अध्यक्षपदी मोहम्मद अझरउद्दीन यांची निवड करण्यात आली आहे. सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा अझरउद्दीन यांनी दर्शवली आहे.

सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघातून अंजनकुमार यादव यांनी या जागेवर 2014 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यांनी पुन्हा या जागेवरुन निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अझरउद्दीन यांनी 2009 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून निवडणूक लढवली होती व ती जिंकली होती. तर 2014 मध्ये राजस्थानमधून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्या जागेवर त्यांचा पराभव झाला होता.