जी-20 देशांचे संमेलन : पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीबाबत सौदी युवराजांसोबत मोदींची चर्चा

0
10

अर्जेटिना | जी-20 देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. भारताला पेट्रोलियम उत्पादने उपलब्ध करुन देणे व त्याच्या स्थिर किंमती या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली. 

दोन्ही देशातील व्यापार, सांस्कृतिक संबंध वृध्दींगत करण्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. याआधी घेण्यात आलेल्या योगा फॉर पीस या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अर्जेटिनातील भारतीय हे दोन्ही देशांना जोडणारा दुवा असल्याचे मत व्यक्त केले. जागतिक अर्थव्यवस्था, शाश्वत विकास आणि हवामान बदल ही दोन्ही देशासमोरीलच नव्हे तर जगापुढील आव्हान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी प्रयागराज येथील कुंभमेळ्यास भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.