#MeToo : ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
16

मुंबई | #MeToo मोहिमेंतर्गत समोर आलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांना अटक होण्याची शक्यता आहे. लेखिका विनिता नंदा यांनी या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी आता बलात्काराच्या आरोपांतर्गत (IPC-376) एफआयआर नोंदविली आहे. आलोकनाथने आपले शोषण केले, असा आरोप विनिता नंदा यांनी केला आहे.

नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात यांनी 8 ऑक्टोबरला एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. त्या तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.